नमस्कार!

फारच छान प्रश्न!

आपण जे उत्तेजक पेय म्हणून पितो तो 'तो' चहा!

परंतु इतरांमुळे प्रभावित होवून आपण त्यांच्याबाबत करतो ती 'ती' चहा!

हो, मराठीत 'चहा करणे' हा शब्दप्रयोग केवळ पेय बनवण्याविषयी वापरत नाहीत, तर 'मी पु.लं.ची चहा करतो' अशा अर्थानेही वापरतात. आणि हा चहा हा 'चाहणे' या क्रियापदापासून आला आहे, ज़सा चाहता आहे तसाच! आणि हा हिंदीचा प्रभाव म्हणून अलीकडे आलेला नाही, उलट आता 'चहा करणे' हा वाक्प्रचार या अर्थाने ऐकायला मिळणे विरळा!

परंतु तो पूर्वी वापरला ज़ात असे हे नक्की. माझ्याकडे कुठलीच मराठी पुस्तके नसल्याने आत्ता संदर्भ देता येत नाही, परंतु मी हा वाक्प्रचार विख्यात लेखकांच्या साहित्यात वाचला आहे, इतकेच काय, महाराष्ट्रात आठवी ते दहावी यत्तांच्यापैकी कितवीत तरी मराठी माध्यमाच्या अगदी अलीकडे बनवलेल्या मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकातील कोणत्या तरी धड्यातही तो आहे, आणि त्याचा अर्थही धड्याच्या शेवटी दिलेला आहे!

थोडक्यात "मी तुमचा 'फॅन' आहे" हे मराठीत म्हणायचे असेल, तर "मी तुमची चहा करतो" असे म्हणता येते!

आलेल्या पाहुण्यांना "तुम्हाला चहा करते" असे म्हणण्याच्याऐवजी "मी तुमची चहा करते" असे म्हटलेले अधिक आवडेल कदाचित!

आपला,

मराठा