कुठे जागतो? जाळतो रात सारी
दिशा म्लान झाल्या न साथीस वारे
नुरे चेतना काय ओठात न्यारी
उरी पेटती वेदनांचे निखारे

हे खूपच आवडले...

पहा, बंद होतील दारे मनाची
नको शोध घेऊस तू काळजाचा
तरी थाप दारी पडे काळजीची
पसारा पुन्हा आत का वादळाचा?

फारच सुंदर...भिडले मनाला!!!