काव्य कोणतेही असो, कठोर शब्द हा कठोर शब्दच आहे, आणि शिवीगाळ ही शिवीगाळच आहे. कवीने स्वतःचा नम्रपणा दाखवायला स्वतःबद्दल एखादा कठोर शब्द योजला तर तो ग्राह्य, पण दुसर्यावर टीका करण्याकरता तोच शब्द योजला तर ती शिवीगाळ हे कसे ?
प्रस्तुत काव्यात, जर कवीने स्वतःकरता 'कुजका' हा शब्द वापरला असता, तर काही तक्रार आली असती असे वाटत नाही. म्हणजे मग या ठिकाणी प्रत्यक्ष शब्दाऐवजी तो कोणाला उद्देशून आहे यावर त्याची कठोरता ठरते का ? हे पटत नाही. शिवीगाळ स्वतःला केली काय किंवा दुसर्याला, शिवीगाळ ही शिवीगाळच असे मला वाटते.