मर्मभेद आणि त्याच्या संबधील आठवणी याला माझ्या भावविश्वात एक आगळे स्थान आहे.
पुर्वी कार्यालयातुन आल्यानतंर वाचनालयात जावुन पुस्तक आणुन वाचणे असा माझा कार्यक्रम असे. अशाच एका दिवशी 'मर्मभेद' माझ्या हातात आले आणि माझे तन-मन , शुध्द विसरुन वाचु लागलो. वहिनी जेवायला बोलवु लागल्या आणि १०/१५ मिनीटे असे सांगुन पुस्तक वाचतच राहीलो. शेवटी त्याना सांगीतले कि मी जेवण घेतो असे सांगीतले आणि पुस्तक वाचतच राहीलो.
शेवटी पहाटेचे ५ वाजले आणि मी कसाबसा जेवायला बसलो. अर्थातच पुस्तक वाचत - वाचतच. इतक्यात बाजुचे आजोबा आले आणि त्यानी विचारले कि " कारे द्वारकानाथ, गावाहुन आला वाटते?" ( आमच्या आणि त्यांच्या घरामधे खिडकी होती) मी निरागसपणे सांगीतले कि " नाही बाबाजी, रात्रभर पुस्तक वाचत होतो."
त्यानी माझ्याकडे ज्या दृष्टीने पाहिले ते आठवले कि आजही मी खजील होतो.