श्री. द्वारकानाथ,
'वाक' येणे असा शब्दही वापरात आहे.
त्याच बरोबर याची कारणे आणि उपाय कोणी सांगू शकेल काय?
याची माझ्या माहितीतली कारणे म्हणजे १) शरीरात मिठाचे प्रमाण कमी होणे. २) स्नायूंना प्राणवायूचा आवश्यक तितका पुरवठा न झाल्यामुळे स्नायूंचा 'थकवा' वाढत जाऊन शेवटी 'वाक' येणे.
उपायः- १) असा 'वाक' आला असता प्रथमोपचार म्हणून मिठाचे पाणी पिणे. नुसते मिठाचे पाणी पिववत नसेल तर लिंबू सरबत करून प्यावे.
२) शारीरिक हालचाल (चालायला जाणे वगैरे) करून रक्ताभिसरण वाढवून स्नायूला प्राणवायूचा पुरवठा करणे. ३) प्रथमोपचारात, बाधीत स्नायूला टर्पेंटाइनने मालीश केले असता गरम वाटून तात्काळ आराम पडतो. ४) कायमस्वरूपी उपायात- तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार त्या विशिष्ट स्नायूला व्यायाम मिळेल आणि त्याची 'अशक्तता' कायम स्वरूपी दूर होईल अशी 'योगासने' करावीत.