भूतकाळातील पापांच्या उशाशी सावल्या
छान आणि रचनेत नेहमीप्रमाणेच वेगळेपणा.
मला मक्ताही आवडला. सानी मिसरा अजून स्पष्ट हवा होता असे वाटते.
गाडले होतेस ज्यांना खोल तू अपुल्या मनी
त्या भुतांच्या खेळती आता जिवाशी सावल्या
हा शेर मात्र विशेष. यात मला असा लहानसा बदल करावासा वाटला -
गाडले होतेस कोणा खोल तू अपुल्या मनी?
(खेळती आता भुतांच्या का जिवाशी सावल्या?)
कळावे. कळवावे. चूभूद्याघ्या.
चित्तरंजन