लिंग भेद-भावावरून आपण एवढ्या चर्चा करतो. असा भेदभाव असू नये म्हणून कंठशोष करतो. मग मनोगताच्या सदस्य माहिती तक्त्यात 'लिंग' ही माहिती का विचारली जाते. तिथे माहिती भरण्याची सक्ती नसेलही पण मुळात अशी माहिती विचारणं, माहिती भरण्यास सुचविणे गैर आहे.
तसेही इथे अनेक पुरूष मनोगती स्त्रीच्या नांवाने आणि स्त्री मनोगती पुरूषाच्या नावाने वावरतात असा बोलवा आहे. तेंव्हा 'त्या' रकान्याला काहीच महत्त्व उरत नाही.