श्री. पेठकरसाहेब,
अशा मोठ्या "सखोल" आणि तांत्रिक विषया वरील लेख समजावून घेण्यासाठी असे लेख कागदावर छापून मग ते वाचण्याची माझी प्रथा आहे. अशा रितीने वाचणे मला संगणक पटलावरून थेट वाचण्यापेक्षा जास्त सुलभ वाटते. तसेच त्यामुळे संगणकावरील वेळ कमी होतो.
छापलेला लेख आपल्या घरातील इतरांना नंतर दाखविता येतो ही आणखी एक जमेची बाजू.
ही प्रथा फक्त मनोगतासच नव्हे तर माझ्या सर्व जा.सं.* साठी वापरात आणणे मला पसंत आहे.
आपले यावर काय मत आहे?
कळावे,
परभारतीय
*जा.सं. = जाल संचार अर्थात नेट सर्फिंग