कार्यालयीन पद्धतीप्रमाणे अभिप्राय देते.

हे आवडले :
रंगीत चित्र. त्यातील सहज समजणारे बाण, नावे इ. त्याला पूरक कॉरिओलिस बलाचे चित्र.
काळाप्रमाणे कसकसे शोध लागत गेले त्याची तपशीलवार माहिती.

हेही हवे :
उदाहरणे. म्हणजे रेनॉल्डच्या आकड्यासाठी पाण्याचा, पेट्रोलचा, ग्रीसचा वगैरे 'र' किती आहे. फेरेलचा निबंधाने कुठली कोडी सोडवली वगैरे.

एकंदरित, माहिती जमवून, त्यावर विचार करून लिहिणे कष्टाचे काम आहे. हवामानासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर म्हणजे आणखीच. म्हणून या लेखाचे विशेष कौतुक.