नम्रता,
दालचिनीची मात्रा बरोबर आहे. दालचिनी गोलाकार नळीच्या स्वरूपात येते. त्याचे चार उभे भाग केले की पन्हाळ्याच्या आकाराचे चार तुकडे मिळतात. बाजारा उपलब्ध दालचिनी या पन्हाळ्याच्या आकारातच बहुतांश मिळते. 'ह्या' आकाराची २०" दालचिनी मला अभिप्रेत आहे. संपूर्ण गोल नळीच्या आकारात असेल तर ५" पुरेल.
काळी इलायची = कडवट चव
हिरवी वेलची = मसालेदार चव
काळीमिरी = मसालेदार तिखट चव
लवंग = जास्त तिखट मसालेदार चव
ह्या सर्व चवींशी समतोल राखण्या साठी दालचिनीच्या = गोड चवीचे प्रयोजन आहे.
काश्मीर हा अतिशय थंड प्रदेश असल्या मुळे एवढे मसाले, केशर या गरम वस्तूंचा वापर जास्त आहे. कितीही आवडले तरीही, दर दोन दिवसांआड मटण रोगन जोश करू नये. बाधेल.