प्रभाकरराव तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे. लिंगभेदावर पक्षपात अथवा अडवणुक करता कामा नये.
मनोगतची रचना करतांना अनेक मराठी भाषिकांनी इतरांशी विचाराचे, माहितीचे आदान प्रदान करावे. कधी थट्टा, मस्करी, गप्पा गोष्टी व्हाव्यात, समवयस्काचे आपापले गट बनावे असा दृष्टिकोन असावा. काही प्रमाणात तत्काळ चर्चेचा ( चॅटिंग) चाही प्रस्ताव विचाराधिन होता, पण त्यासाठी लागणारे आज्ञावलीचे तंत्रज्ञान चालले नाही असे आठवते.
त्यामुळे कोणी लिंगावर आणि वयावर आधारीत माहिती दिली तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदा. वेदश्री, मृदुला, राधा, अदिती, श्रावणी, अनु, वरदा चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात. विनायकराव, तुम्ही, भोमेकाका, अगस्ती, दंतकर्मी यांचा वेगळा गट होऊ शकतो. कोणाला काही सल्लामसलत करायची असल्यास तो त्या त्या व्यक्तिरेखा पाहुन त्याप्रमाणे संदेशवहन करु शकतो. 
काही प्रमाणात अशी माहिती उपयुक्त ठरु शकते आणि कधी कधी त्याची डोकेदुखीपण होऊ शकते.
एक मुद्दा बऱ्यापैकी चर्चेत आहे की टोपणनाव असावे की नाही? मला वाटते की याचाही बाऊ न होता विचारांचे आदान प्रदान होत असेल तर याकडे दुर्लक्ष करणेच सोयीस्कर.
अर्थात कोणी याचा अवाजवी गैरफायदा करुन घेत असेल अथवा मनस्ताप देत असेल तर प्रशासकाकडे तक्रार करणेच योग्य.

असो, मी माझे मत मांडले.

द्वारकानाथ