वपु माझेही आवडते लेखक होते/आहेत.

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

वाक्य खूप चांगलं आहे. पण गरूड पिंजऱ्याबाहेर आहे असे गृहीत धरले आहे. जे 'गरूड' परिस्थितीच्या पिंजऱ्यात अडकलेले असतात त्यांचं दुर्दैव वपुंनी जाणलेले दिसत नाही.

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

जमिन न सोडताही अनेकांना आपण 'ती' उंची गाठली आहे असा भ्रम होतो आणि ते मात्र इतरांची 'समस्या' बनतात.