सर्व वाचकांना व प्रतिसाद, व्य. नि. लेखकांना मनःपूर्वक धन्यवाद.
लेख समजायला जड जात असेल तर मला सुधारणेला वाव आहे असे म्हणायला पाहिजे. लेखातील कोणता भाग समजण्याच्या दृष्टीने जड आहे, तो तसा नसण्यासाठी काय करावे ह्याबद्दल कृपया मते कळवा, म्हणजे तेवढ्या भागाचे अधिक स्पष्टीकरण करता येईल, तसेच पुढील लेख लिहिताना भाषेत वा वाक्यरचनेत बदल, सुधार करता येतील. क्लिष्ट शास्त्रीय विषयावर लेख लिहिताना ही अडचण येते. सोप्या भाषेत सांगू जावं तर विषय खोलात न जाता मांडावा लागतो. विषय खोलात जाऊन मांडावा तर विषयाबरोबरच भाषाही क्लिष्ट होते. त्यामुळे मी माझ्या परीने दोन्हीचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रयत्नातल्या त्रुटी घालविण्यासाठी मला वाचकांची मदत हवी आहे. कृपया आपल्या सूचना सविस्तर कळवा.