वा श्री. तुमचा आनंद,

श्री. वपुंची काही पुस्तके माझ्याही संग्रही आहेत. वपुंचे लेखन, कथाकथन तर पुन्हा पुन्हा वाचावेसे, ऐकावेसे वाटतेच त्याच बरोबर  पार्टीत सतत हसते खेळते वातावरण ठेवणे हाही त्यांचा हातखंडा.
मस्कत मध्ये माझ्या घरी आले असता 'स्त्री-मुक्ती' या विषयावर वातावरण तापू न देता उत्कृष्ट विवेचन त्यांनी केले होते. त्यांच्या सारखा उमद्या स्वभावाचा माणूस प्रत्येकाला आपलासा वाटतो. ....त्यांच्या प्रत्येक कथानायका सारखा.