नमस्कार.
'ज' च का हा मराठीमहोदयांनी केलेला खुलासा नीटसा कळला नाही.
कारण ज्ञ या अक्षराची फोड मूळ संस्कृतमध्ये 'ज्' ने सुरू होते. ज़र ती मराठीप्रमाणे द् ने सुरू होणारी असती, तर कदाचित तिथे तो 'ज' आला नसता.
(पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी तिचे रोमनमधून नाव 'Jnana Prabodhini' असे लिहिते, 'Dnyana Prabodhini' असे नव्हे.)
आणि इथे ते 'ज्' येण्याचे कारण म्हणजे 'तत्' शब्दातील त् हे पुढील 'ज्ञ'मधील ज् च्या आधी आले की ज् होते. (ज़से सत् + जन मध्ये त् चे ज बनून सज्जन शब्द तयार होतो तसे. या संधिप्रकाराचे नाव आठवत नाही. ज़से की सच्चारित्र्य वगैरे..)
आणि याचा पुढचा भाग असा की गणितज्ञ, संगीतज्ञ हे शब्द बरोबर.
'ज्ञ' चा उच्चार आपण सर्वस्वी चूकीचा करतो असे मी ऐकले आहे.
हे अन्यायकारी विधान आहे.
मराठीतील 'ज' किंवा 'च' वगैरे अक्षरांबाबतही मग असेच म्हणणार का? त्यांचा उच्चार तरी मराठीत कुठे मूळ देवनागरीप्रमाणे होतो?
मराठीची (किंवा हिंदीची) देवनागरी लिपी ही संस्कृतच्या देवनागरीत काही बदल करू शकत नाही काय?
ज्ञ हे जे अक्षरचिन्ह आहे, त्याचा मराठीतील व हिंदीतील उच्चार हा हिंदीतील उच्चारापेक्षा निराळा आहे असे म्हणायला काय हरकत आहे? (म्हणजे संस्कृतमध्ये ज् + न् + अ (किंवा इथे सुचवले आहे तसे कदाचित ज् + ञ् + अ), हिंदीत ग् + य् + अ आणि मराठीत द् + न् + य् + अ)
अक्षरचिन्हे म्हणजे उच्चार असे नव्हे. (ज़से अंकांची चिन्हे म्हणजे अंक नव्हेत तसेच!)
रोमन लिपीतील अक्षरचिन्हांचेही निरनिराळ्या भाषांत निरनिराळे उच्चार होत नाहीत काय? मग त्यातला एकच बरोबर, व अन्य चूक असे आपण म्हणतो काय? (ज़से की A हे इंग्रजीत 'ए' असेल तर जर्मनमध्ये 'आ' असते, आणि तसेच क्रमाने आ, बे, त्से, दे... वगैरे.)
प्रत्येक भाषेला तिच्या भाषावृक्षातील आधीच्या शाखेला पुरते बांधूनच टाकायचे असेल, तर मग तिला निराळी भाषा कशाला म्हणायचे? किंवा मग ती निराळी हवी तरी कशाला?
मराठा