भोमेकाका,
आनंद आहे. यामागे एक छोटी पण गुंतागुंतीची कथा आहे.
मागे एकदा कथांच्या जावयाचा शोध सुरू असताना, "प्रवासीमहोदयांनी आपल्या लिखाणाचे दुवे व्यक्तिरेखेत दिले आहेत" ही माहिती मी अनु यांना दिली. वर लहान तोंडी मोठा घास घेऊन, "तुम्हीही तुमच्या लिखाणाच्या चाहत्यांसाठी तसे करावे", अशी विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन त्यांनी आपल्या लिखाणाचे दुवे आपल्या व्यक्तिरेखेत दिले. त्याचबरोबर, "इतर मनोगतींनीही तसेच करावे" असे आवाहनही केले.
त्यामुळे माझ्यासारख्या लोकांना चांगले लेख शोधणे सोपे झाले आहे. पण उत्खननशास्त्रात आपले कौशल्य वादातीत आहे.