नमस्कार,

इंटरनॅशल – अन्तर्राष्ट्रीय हिंदीत, मराठीत आंतर्राष्ट्रीय
इनलँड – अन्तर्देशीय हिंदीत, मराठीत आंतरदेशीय

आंतर्राष्ट्रीय (किंवा आंतर्देशीय) असा शब्द मराठी/हिंदी/संस्कृत या भाषांमध्ये नाही.

इनलँडसाठी मराठीत आंतरदेशीय असा शब्द नसून तो अंतर्देशीय असाच आहे. ज़र आंतरदेशीय असा तो वापरला ज़ात असेल तर त्याचे कारण अज्ञान हे आहे.

मला असे वाटते की हिंदीत संस्कृत शब्द आणि प्रत्यय आदी अधिक प्रामाणिकपणे वापरल्या जातात.

हे फारच ओढून ताणून केलेले विधान आहे. अधिक उदाहरणांचा विचार व्हावा.

आपला,

मराठा