मृदुलाताई,

आपल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत म्हणून आपले वडे करणे राहून गेलेले दिसते.  जमेल त्याप्रमाणे शंका निरसन करीत आहे.

१.  डाळ भरपूर पाण्यात भिजवायची, म्हणजे डाळ भिजून फुगल्यावरसुद्धा पाण्यात बुडालेली राहील.  वाटताने त्यातले पाणी वाटण्यास घ्यायचे नाही.  साधारण उथळ चमचा किंवा डावेने ती डाळ उपसून ब्लेंडर/ग्राईंडर मध्ये घालावी. असे करताना त्या डाळीमध्ये थोडे पाणी शिल्लक राहते तेव्हढे वाटण्यास पुरेसे होते.

२.  वाटताना किंचित चवीपुरते मीठ घाला.

३.  चिंचेची चटणी --  भारतीय दुकानात चिंचेचा कोळ/पेस्ट प्लास्टीकच्या डब्यात मिळतो.  त्याचा एक चमचा घेऊन तो थोड्या पाण्यात नीट मिसळून घायचा.  त्यात साखर/गूळ, थोडे तिखट आणि जिरे पूड घालून हवे तितके पाणी घालून ही चटणी तयार होते.  दाट हवी असेल तर खजूर वाटून लावू शकता.  तसेच इकडे ऍपल सॉस म्हणजे सफरचंदाचा गर मिळतो तो पण चवीसाठी आणि घट्टपणासाठी खजूराऐवजी आम्ही वापरतो.  आपल्याला हवी तशी चव पदार्थांच्या कमीजास्त प्रमाणाने जमवून घ्या.

कसे झाले वडे ते जरूर सांगा.

कलोअ,
सुभाष