इंटरॅक्शन चे इंग्रजीमध्ये संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ होतात उदा. "इन ऍन
इंटरॅक्शन विथ xxx..." चे "xxx शी चर्चा करताना.." असे होईल, "इंटरॅक्शन
विथ अ ग्रुप" चे "समूहाशी मिसळण्याची क्रिया" वगैरे, त्याला एकच मराठी
शब्द माहित नाही. पण संदर्भानुसार वेगवेगळे शब्द वापरता येतील. आपल्या
वाक्यात,
माकडांच्या, कपींच्या सामाजिक इंटरॅक्शनमधला महत्वाचा घटक म्हणजे 'ग्रूमिंग'
इथे "सामाजिक इंटरॅक्शन" साठी "सामाजिक वर्तणूक" आणि "ग्रूमिंग" साठी "जडणघडण" असे वापरता येईल असे वाटते.
"ग्रूमिंग" हा आजकल खूप प्रसिद्ध झालेला शब्द. "टू ग्रूम" साठी "घडवणे" असे होऊ शकते. "ग्रूमिंग" साठी "जडणघडण"
चूभूद्याघ्या