ग्रूमिंगचे माझ्याकडील शब्दकोषात दोन मुख्य अर्थ दिले आहेत. एक म्हणजे 'एखाद्या व्यक्तीला पुढील जबाबदारीसाठी तयार करणे' आणि दुसरा म्हणजे 'बाह्यरूपाचे सौंदर्यवर्धन करणे, प्रसाधन करणे', सोप्या भाषेत नट्टापट्टा करणे. मला अर्थ विचारताना दुसऱ्या प्रकारचे ग्रूमिंग अपेक्षित आहे. संगोपन, जडणघडण या (पहिल्या) अर्थाचे नव्हे.
ग्रूमिंगमध्ये शारिरीक स्वच्छता (उदा केस विंचरणे) तसेच रूपसंवर्धन दोन्ही अपेक्षित आहे.
संदिग्ध प्रश्नाबद्दल दिलगिरी.