अतिशहाणपणा करून आणि खोटारडी कारणे देऊन हा आगाऊपणा करण्यात आला. नवीन येणाऱ्या धर्माधिष्ठित दांभिक लोकशाही पेक्षा सद्दाम ची हुकूमशाही बरी होती असे म्हणायची वेळ बुश पितापुत्रांवर येणार आहे असे दिसते. महासत्तेसाठी दुसरे व्हिएटनामच जणू.
बगदाद (सध्या इराक), दमास्कस (सध्या सिरीया), मक्का व मदिना (सध्या सौदी अरेबिया), जेरुसलेम (सध्या इस्त्राईल), इस्तंबूल (सध्या तुर्कस्तान) ही मुस्लिमांची जिव्हाळ्याची ठिकाणे होत.
या हल्ल्याने बगदाद ला धक्का लावला आहे. जर का धर्मनिरपेक्ष आणि संपूर्ण लोकशाही स्थापन झाली नाही तर लढाई जिंकूनही युद्ध हरल्यासारखेच होईल. आता तिथे जोवर संपूर्ण लोकशाही स्थापन होत नाही तोवर यांना लष्करी तळ तिथे ठेवावेच लागतील. हे लष्करी तळ तेथे आहेत म्हणून अतिरेक्यांना चेव चढेल आणि त्यांना चेव चढू नये म्हणून लष्कर तेथे ठेवावेच लागेल. अश्या प्रकारे त्यांची दगडाखाली बोटे अडकली आहेत.
खाजवून खरूज काढणे यालाच म्हणत असावेत!