मित्रवर्य श्री. चित्तरंजन,

पाठ्यपुस्तकांच्या विचाराबाबत.

शब्दांच्या जंगलात जाण्याऐवजी मी मूळ विषयालाच स्पर्श करणे योग्य समजतो. मराठी हा माझ्या आत्मीयतेचा , आपुलकीचा विषय आहे. मराठी टिकवण्यासाठी अनेक नित्य, नूतन आणि विविध प्रयोग केले जावेत, उपक्रम राबवले जावेत, अनेक गुणवंतांना उत्तेजन दिले पाहिजे असे मला प्रांजलपणे वाटते.

अनेक वेळेस लोकांमध्ये गुणवत्ता असते पण दिशा अथवा प्रेरणा नसते आणि ते लोक तेथल्या तेथेच राहतात.

वेदश्री, मृदुला, वरदा , मीराताई, परेश, प्रभाकर, तुम्ही आणि इतरही हे सर्वच जण गुणवंत आहेतच. पण प्रत्येक जण संधीच्या अभावी अथवा हेही ते करु शकतात अश्या विचारा अभावी काही करत नसतील तर त्यांच्या सुप्त गुणांना प्रेरित केले तर बरेच आहे असे मला वाटते.

अर्थातच या सर्वांच्या लेखावर आवश्यक ते संस्कार, संपादन आणि समीक्षण करुनच ते वर्तमानपत्रात, पाठ्यपुस्तकात अथवा एखाद्या पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध होऊ शकतील यात दुमत असू नये.

सुदैवाने तुमचा अनुभव आणि व्यासंग दांडगा आहे. माझ्या विचारामध्ये काही उणीवा, त्रुटी अथवा चुका असतील तर ते समजावून घ्यायला मला निश्चितच आवडेल.

विषय मराठीचा आहे म्हणून तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

सस्नेह,

द्वारकानाथ