खरेतर जी.एं. च्या गूढकथा धारप किंवा मतकरींच्या कथांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. सर्वसाधारण गूढकथा या अमानवी, अतिंद्रीय शक्ती, स्पष्टीकरण देता येत नसलेले प्रसंग, चमत्कार ई. गोष्टींवर आधारीत असतात; पण जी.एं. च्या गूढकथा याहून खूप वेगळ्या आहेत. त्यांचा उद्देश वाचकाला एखादा सनसनाटी, रोमांचकारी अनुभव द्यायचा नसतो, तर एकूणच जीवनावर काही खोल भाष्य करण्याचा असतो. म्हणून माझ्या मते जी. एं. च्या गूढकथा या सर्वसाधारण गूढकथेच्या व्याखेत बसत नाहीत. तो एक स्वतंत्रच कथाप्रकार आहे.