स्वप्न हे असंबद्ध आणि बाहेर घडणार्या गोष्टींमुळे modulate होत असते हे खरेच आहे.
स्वप्नामुळे कागदावर कल्पने(*)ची दाही दिशाना झेपावणारी मोकाटता उतरवता येते. एरव्ही असल्या गोष्टी जागेपणी कोणाला पचतात? स्वप्नभरारी वेळकाळ, स्थळवाट, लिंगभेद यांच्या पलिकडे जाऊन पोहोचते. म्हणून तर बरेच वेळा आपण जागे झाल्यानंतर आपल्याला स्वप्नाचे "details" आठवणे अवघडच असते.
बाकी सुरुवातीला "सोनेरी केसांनी मढलेली" ती सुंदरी वाचता वाचता आमच्या हिचा चेहेरा बघण्यालायकच होता. अगं तूच ती हे सांगता सांगता नाकी नऊ आले.
ह्या कथेचा उद्देश्श्य केवळ निखळ मनोरंजन असा आहे. कुठले काही नीट बसत नाही असे वाटले तर स्वप्न होते म्हणून जाऊ द्यावे!
*कल्पना = शशांक प्रमाणे imagination बरं का!