धन्यवाद पवन,
'मी एक कावळा..' ही कथा त्या मानाने (विस्तार भयास्तव) मी लवकर आटोपती घेतली. कारण वाचकांनी कंटाळू नये हाच एकमेव विचार. अन्यथा कल्पनाविस्तारात क्षितिजा पर्यंत वाव आहे.
आपण आपले विचार भावना शब्दात व्यक्त करू शकतो. पण मुक्या प्राण्यांचे काय? त्यांचे चेहरे, हालचाली निरखूनच त्यांना 'वाचायचा' प्रयत्न करायचा. मजा येते असे करताना. आपला वेळही चांगला जातो आणि प्राणी-पक्षांशी मैत्रीही होते. जग हे फक्त मानवजातीचे नाही.
माझा एक मित्र तर रस्त्यावरच्या वाहनांच्या चेहऱ्यावरून, आवाजावरून, रुपा वरून सुंदर कॉमेंट्स करतो. ('मर्सिडीज' गाडी कधीच दुसऱ्याच्या दुःखात सामील होणारी वाटत नाही, तर 'हातगाडी' नेहमीच वाहन समाजातील 'शोषीत' वाटते. हे नमुन्या दाखल वाक्य.)