मरण कोणालाही चुकले नाही. ते कधी येईल हे ही माहित नाही. ते माहित नाही ही किती चांगली गोष्ट आहे ना? नाहीतर मरणदिनाची वाट पाहतंच सगळेजण जगले असते आणि ते जीवन अधिकच भयानक झाले असते.

जवळचे माणूस जाण्याचे दुःख सर्वांनीच कधी ना कधी अनुभवले आहे. 'बुद्ध आणि तांदूळ' ही गोष्ट आठवत असेलच. ते दुःख उगाळत न बसता त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.

परभारतीय यांनी वर म्हणाल्याप्रमाणे त्या व्यक्तीचे सकारात्मक गुण आपल्या आचरणात आणण्याच प्रयत्न करावा असे वाटते.