टंकलेखन साहाय्यात दिलेला अक्षरक्रम हा मराठीसाठी सर्वसाधारण पणे योग्य आहे. मात्र क्षचे शब्द क च्या शब्दांपाठोपाठ आणि ज्ञ चे शब्द ज च्या शब्दापाठोपाठ येतील, तेही योग्यच आहे. ऍ ऑ साठी आम्ही साहाय्याच्या सोयीने काही फरक केलेले आहेत.

सुदैवाने देवनागरी युनिकोड अक्षरे मूळ देवनागरीच्या क्रमानेच (बरीचशी) असल्याने विशेष काही न करता आपोआप हा क्रम साधला गेला आहे.

मनोगताच्या पुढच्या आवृत्तीत मात्र ह्यात आणखी अचुकता आणण्याचा उद्देश आहे. (उदा ज़ चे शब्द ज नंतर, ख़ चे ख नंतर इ.)