कोणतेही शास्त्र बनते तेंव्हा अभ्यासाची आवश्यकता असते. एकदम खरे की खोटे, कितपत विश्वासार्ह यापेक्षा कोणत्या तंत्राचा त्यामध्ये वापर होतो असा विचार झाला तर बरे होईल.
पंचाग, अध्यात्म, आधिकारी वर कोणी उपयुक्त माहिती दिली तर बरे होईल.

किंवा ज्योतिषासंबंधी कोणी आपापल्या आठवणी सांगीतल्या तर हा विषय जास्त रंगतदार होईल.

एकदा मी असाच काही कामानिमित्त्याने कै. श्रीकांत जिचकरांना भेटलो होतो. त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यासाठी ते उपचारासाठी अमेरिकेला पण जाऊन आले होते. गप्पांच्या ओघात त्यांनी सांगीतले मला विश्वास आहे ( त्यांनाही ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते.) माझा मृत्यू कधीही कर्करोगाने होणार नाही. त्यानंतर काही काळानंतर त्यांचा मृत्यू हा एका रस्ता अपघातात झाला.