शुद्धिचिकित्सकात एखादा शब्द 'चुकीचा' दाखवले असेल पण पर्यायी शब्द दिला नसेल तर 'योग्य' तो शब्द तिथेच टंकलिखित करून मूळ शब्द बदलण्याची सुविधा असेल तर बरे होईल. उदा. 'हेटाळणीयुक्त' हा शब्द माझ्याकडून चुकून 'हेताळणीयुक्त' असा टंकलिखित झाला होता. तो शुद्धिचिकित्सकाने 'चूक' म्हणून दाखवला पण पर्याय दिला नव्हता तसेच तिथल्या तिथे शब्द सुधारण्यासही वाव नव्हता. असे ४-५ ठीकाणी झाले तर शुद्धिचिकित्सकातून बाहेर पडून मूळ लेखातील ते-ते शब्द शोधून सुधारणा करावी लागते. ह्यात पुन्हा एखादा शब्द नजरेतून निसटून 'अशुद्धच' राहू शकतो.