मध्ये माझा आणि चित्तरंजन यांचा मनोगत आणि मराठी यावर काही व्य नि मधून काही चर्चा झाली होती. त्यातील एक चित्तरंजन यांचा प्रतिसाद मला आवडला म्हणून मी तो इतरांसाठी प्रसिद्ध करत आहे.

"मनोगतावरील कविता, लेख, कथा इत्यादि साहित्य मर्मज्ञ समीक्षकांकडून, अभ्यासकांकडून चाळले गेले तर उत्तम होईल. त्यांचे अभिप्राय वाचून लेखकाला आपल्या उणिवांची आणि मर्यादांची जाणीव होईल आणि शक्तिस्थळेही त्याला कळतील. थोडक्यात इथल्या साहित्यिकांना बाहेरच्या जगात वावरायला हवे. त्यांनी ते बघायला हवे. अर्थात हे कठीण आव्हान आहे. मनोगत एक संकेतस्थळ म्हणून आपली कामगिरी चोख बजावते आहे, लोकांना लिहिते करते आहे. लिहिणाऱ्यांनीही आपली क्षितिजे रुंदावयाला हवी, असे मला वाटते. इथे चांगले लिखाण म्हणजे काय हे दाखविण्यासाठी मान्यवरांचे लिखाण, दर्जेदार साहित्यकृतींचे रसग्रहण पूर्वपरवानगी घेऊन प्रकाशित केल्यास उत्तम होईल. भाषाविषयक लेख अधिकाधिक छापले जावेत. मराठी भाषा - जीवन आणि विकास सारख्या मराठी भाषेला वाहून घेतलेल्या नियतकालिकांकडून मदत घेता येईल. तिथले लेख इथे छापता येतील. याप्रकारे मराठीत अनेक अनियतकालिके आणि नियतकालिके आहेत, त्यांच्याशी सहकार्य स्थापित करता येईल. असो. मनोगताने आपला वार्षिकांक (पीडीएफ़ फायलीत) प्रकाशित केल्यासही चांगले होईल. वाद टाळण्यासाठी यातील साहित्याची निवड मनोगताशी कुठलाही संबंध नसलेल्या मान्यवरांकडून करता येईल. मनोगतावर कथांसाठी, लेखांसाठी, कवितांसाठी एखादी प्रायोजित स्पर्धा आयोजित करता येईल. भाग घेण्यासाठी केवळ मनोगताचे सभासद असणे आवश्यक ठेवावे. असो. तूर्तास एवढेच. तुमचा, चित्तरंजन"

चित्तरंजन यांचा अभिप्राय हा नवीन आणि उदयोन्मुख कलाकारांसाठी खूपच चांगली दिशा देईल यात शंकाच नाही.

मुख्य म्हणजे आपण आपल्यात गुणवत्ता वाढवलीच पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही असे मला ही वाटते.

भरपूर पूर्वतयारी, मर्मज्ञ समीक्षकाकडून गुण दोषाची चिकित्सा, काटेकोर सवयी याचा अवलंब केला तर मराठीत सुद्धा अनेक नवीन तारे जन्माला येतील यात शंकाच नको.
तूर्त इतकेच.

द्वारकानाथ