असे करता आले असते तर आम्ही सोडले असते काय? ;-)
जेव्हा आपण वर्ड किंवा इतर कुठल्याही सुविधेत काम करीत असतो तेव्हा ती सुविधा त्यातल्या स्पेलचेक वगैरे सर्व कार्यक्रमांसोबत आपल्याच संगणकावर असते. त्यामुळे हे 'तेथल्या तेथे' दुरुस्तीचे तंत्र तेथे जमते.
मनोगत आपल्या संगणकावर नसते, ते एक संकेतस्थळ आहे. इतर कुठल्याही संकेतस्थळाप्रमाणेच मनोगताचे एकेक पान आपला ब्राउझर त्या त्या वेळेला आपल्या संगणकावर आणत असतो. त्यामुळे त्यात आपण जे लिहितो ते मनोगताच्या शुद्धिचिकित्सकाला आपण 'पाठवल्या'शिवाय कळत नाही.