मासॉ कार्यालय प्रणाली आणि इतर कोणत्याही तत्सम प्रणाल्या या आपल्या संगणकावर चालतात (की पळतात? रन=पळ ;) त्यामुळे उपयोगकर्त्याने दाबलेल्या कळा आणि टिचक्या यावर लक्ष ठेऊन त्याप्रमाणे निरनिराळे निर्णय घेऊन दृष्य स्वरूपात (उदा. लाल, हिरव्या रंगाने अधोरेखन वगैरे) संदेश देऊ शकतात.
याउलट कुठल्याही संकेतस्थळाचा कार्यक्रम (काही अपवाद वगळता) सेवादात्यावर चालतो. सेवादात्याकडून ब्राउजरकडे फक्त पान दाखवण्यास आवश्यक माहिती येते. एकदा ती माहिती आपल्या संगणकावर आली की ब्राउजर आपल्याला ते पान दाखवतो. यापुढे आपण इथे काय लिहिले आहे हे सेवादात्याला आपोआप कळण्याचा मार्ग नाही. याहू वगैरे मोफत इ-संदेश सेवेवरही स्पेलचेक साठी तुम्हाला विशिष्ट ठिकाणी टिचकी मारून आपले लिखाण सेवादात्याला पाठवावे लागते.
चूभूद्याघ्या