भविष्य कसे वर्तवायचे याचे साधे सोपे नियम तुम्हालाही सांगतो..

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (हो तेच! 'सुदाम्याचे पोहे' वाले) म्हणतात त्याप्रमाणे भविष्य कथनाचे तीन आधार स्थळ, काल व घटना... यातील एक गायब करा की झाले भविष्य तयार!

स्थळ - २००७ मध्ये पुरात मोठी मनुष्यहानी होऊन हाहाकार माजेल. (भारतात आसाम, बिहार इत्यादी मध्ये तर जगभरात चीन व बांगलादेशात दरवर्षी पूर येतो! हमखास फळ आहे)

काल - चीन मध्ये मोठा भूकंप होऊन मोठी मनुष्यहानी होईल!

(कधीतरी होईलच तो, तेंव्हा म्हणा .. बघा मी नव्हतं म्हटलं!)

घटना - २००७ मध्ये भारतीय राजकारणात फार मोठी उलथापालथ होईल (ही होतच असते... निवडणूक असणारे वर्ष असेल तर दुधात साखर!.. नाहीतर अम्माचा पराभव यालाच उलथापालथ म्हणा झालं)

या पेक्षा चांगले व अधिक सविस्तर भविष्य सांगणारा भेटल्यास कळवा...कळताच मी पळत येईन!