वर्षानुवर्षे लोक हे खरे मानतात परंतू त्यात किती तथ्य आहे कोणास ठाऊक? (मी देव म्हणणार नाही. तो वेगळा विषय आहे.)
मागील वर्षी त्सुनामी नंतर लगेच ज्योतिषी पूढे सरसावले सांगायला.. ह्या ह्या ग्रहाच्या ह्या ह्या हालचालीमुळे त्सुनामी झाले.
आधी नव्हते कळले का तुम्हाला?
मग लगेच उत्तर तयार.. भूकंप/पूर.. आधी सांगता येत नाही ती निसर्गाची करणी आहे.
अरे, मग जर सर्व आधीच ठरवून आहे तर तुम्ही काय करणार त्यात?
शनी वक्री आहे, हा ग्रह प्रतिकूल आहे.. अशी अशी पूजा केल्याने तुमचे असे वाईट होणार नाही. असे म्हणतात.
पण आपण कशावरून म्हणू शकतो की जरी पूजा केली तरी पूजा केल्यानेच सर्व काही घडले, किंवा नाही केल्यामुळे घडले.. जर काही घडायचे ठरले असेल तर ते घडेलच. तुम्हाला ते कळुनही काय फायदा? हं..कोणी हे म्हणू नक्की म्हणू शकेल की मला हे माहितच होते..
दोन महिन्यांपुर्वी जेव्हा नासाने एका धुमकेतू (?)वर हमला(?) केला आणि त्याची दिशा बदलली. (ह्यातील नक्की बातमी ध्यानात नाही. चू.भू.द्या.घ्या) त्यानंतर एका रशियन महिलेने त्यांच्यावर केस केली की त्या प्रयोगामूळे त्यांचे गणित चुकेल. पण जर एखाद्या धुमकेतू/ग्रहाच्या जागेवरून हालचालीवरून भविष्याचे गणित काढता येते तर तुम्हाला हे नाही समजत की त्या धुमकेतूवरच काहीतरी घडणार आहे?
अजूनपर्यंत मुंबईच्या पुराबाबत कोणी ज्योतिषी अजून काहीच कसे बोलले नाही ह्याचेच नवल आहे ...
-देवदत्त