अगदी ३६ गुण जुळून लग्ने मोडतात आणि पत्रिका न जुळणारे पण पत्रिका न बघता केलेले संसार यशस्वी होतात. याचे उत्तर मागावे तर "त्यांच्या पत्रिका चुकीच्या असतील" असे उत्तर येते!

असहमत. आम्ही अनेक ज्योतिषांना आव्हान दिले आहे की मानवी आयुष्यातील पाच महत्वाच्या घटना सांगा. जन्मवेळ अचूक दिली जाईल, तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे पत्रिका मांडा. विवाह सांगता येत असेल तर तो सांगा, शिक्षण सांगा, घटस्फोट असेल तर तो सांगा, अपघात सांगा, संतती सांगा. तुमचे भाकीत ८०%पर्यंत अचूक आले तर हे शास्त्र आहे, याला काही आधार आहे असे मानता येईल. पण आजपर्यंत एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्विकारलेले नाही.

अगस्ती महोदय, बहुतेक आपण दोघे एकच मुद्दा मांडतो आहोत असे दिसते.

आणखी एक निरीक्षण. हे भविष्यवालेबुवा हमखास भूतकाळाबद्दल माहिती सांगत बसतात. अरे, आमचाच भूतकाळ आम्हाला काय सांगता, तो आम्हाला माहित आहे. मला तरी हे सगळे पोरखेळ आहे असे वाटते.

गडकाऱ्यांना या कारणासाठी संपादक पद सोडावे लागले होते हे माहित नव्हते.