ज्योतिष शास्त्र हे एक मजेचा भाग आहे असे वाटते..!! नक्की माहीत नाही..;)

माझ्या एका माहितीतील एका तरुणी ने.. एका मुस्लिम मुलाशी लग्न केले आहे.. आणि एकीने ख्रिस्ती बांधवाशी ( खरे सांगते आहे.. चित्रपट कथा नाही..) त्यांचे दैव दयेने सुरळीत चालू आहे..  आता मला एक सांगा ह्यांच्या कशा हो पत्रिका जमवायच्या..!!

एकाने तर म्हणे चक्क एका मुलीला सांगितले.. की माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे पण आपली पत्रिका जुळत नाही तर आपले लग्न होऊ शकत नाही.. वा..!! काय अंगात जबरदस्त गुण (??)असलेला मुलगा आहे हो हा..!! ( सर्व मुलांना अजिबात ध्यानी घेतलेले नाही हि एक सूचना.. हि एक स्पेसीफ़िक केस आहे... नाहीतर त्याच्यावर एक नवीनं जोरदार चर्चा होईल कारण नसताना..)

अजून साडेसाती हा एक प्रकार.. आता मला एक सांगा मुळात साडेसात वर्षे हा कालावधीच इतका मोठा आहे तर आयुष्या मध्ये काही उलथा-पालथ होणारच की हो..!! येथे दोन चार दिवसा/महिन्यामध्ये सुधा माणसाची अवस्था( सर्वच बाबतीत .. घर, पैसा, तब्येत .. इत्यादी )काही कारणाने वर-खाली होऊ शकते तर साडेसात वर्षे काय चीज आहे हो..!! पण तरी जरा वाकडे आयुष्यामध्ये झाले की हे लोक सांगतात साडेसाती चालू( खरेच ती चालू म्हणजे बेरकी हो...;) दिसते आहे  आणि  हे विचारायला जाणारे ही धन्यच..!!

गार्गी