ज्योतिषावर साधक बाधक चर्चा होत असतानाचे 'शास्त्रा'चे यावर काय म्हणणे आहे हे ही पाहणे रोचक ठरेल. एका प्रकारे 'भविष्य सांगता येते' म्हणणारे 'शास्त्रवादी' आहेत तर ते तसे सांगता येत नाही म्हणणारे 'दैववादी' आश्चर्य वाटले ना?.... कसे?.... हे पाहा..

'शास्त्र' आपणांस सांगते प्रत्येक गोष्टीत कार्य-कारण भाव आहे. याआधी काय व कसे झाले हे नक्की माहित असेल तर यानंतर काय होईल हे सांगता यायला हवे. (जग हे मोठ्या विशाल 'पूल टेबला'प्रमाणे आहे ज्यात सुरुवातीची स्थिती, मारल्या जाणाऱ्या चेंडू(?)ची दिशा व वेग यांची 'नक्की' माहिती असल्यास अंतिम स्थिती सांगण्यास शास्त्र समर्थ हवे (जे सध्या नाही..प्रयत्न चालू आहेत).

(याला हैजनबर्ग नावाच्या सद्गृहस्थाने थोडी खीळ घातली खरी...पण एक शक्यता म्हणून विचार करा..)

शास्त्राच्या दृष्टीने भूत व भविष्य अगर काळाची दिशा या गोष्टी शास्त्रीय नियमांत बदल करत नाहीत. त्यामुळे "आपल्याला भूतकाळच का आठवतो आणि भविष्य का "आठवत" नाही" हा योग्य व गहन प्रश्न आहे. (शशांक यांचा सापेक्षता नावाचा प्रतिसाद वाचा).  यालाही काळाचे तीन दिग्दर्शक आहेत ज्यामूळे आपल्याला भूत व भविष्य यातला फरक कळतो!

या उलट "भविष्य हे मानवी समजा पलीकडचे आहे. ते समजणे शक्य नाही" असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे या साऱ्यावर नियंत्रण असणाऱ्या एका विश्वनियंत्याचे अस्तित्व मानल्या सारखेच नव्हे काय?

आता 'सध्या सांगितले जाणारे भविष्य' व त्यांचे 'शास्त्र' यावर माझा अभ्यास अगदीच नगण्य असल्याने त्याच्या सत्यासत्यतेवर भाष्य करणे मी इथे गैरलागू समजतो.

(काही माणसे हजारो वर्षे एका असंबद्ध कल्पनेवर शास्त्र म्हणून चर्चा करत आली आहेत हे मला समजायला थोडे जड जाते खरे... या मागेही मानवाची भविष्य जाणून घ्यायची वैश्विक उत्सुकता इत्यादी कारणे आहेतच)

पण 'असलाच तर' भविष्याचा संबंध त्या दूर असलेल्या 'ताऱ्यांशीच' (खगोलशास्त्र, काळ, भौतिकशास्त्र) आहे हाही पुरेसा 'मोठा योगायोग' नव्हे का? (खगोलशास्त्री काळ भूत-भविष्य यासारख्या फुटकळ विषयांवर खल करत असावेत बरे?)

आता तुम्हाला पटणार नाही हे कदाचित पण "भविष्या" (जर पटणार असेल) तर पटू शकेल!