मला असे काही प्रश्न पडले आहेत-
- चांद्र आणि सौर्य राशीचक्रांमध्ये बारा राशींचे साम्य कसे काय? असे असूनही सौर्यराशी तारखेवार मात्र चांद्रराशी जन्म-स्थल-काल-तिथी यानुसार... असे कसे?
- आजकाल मुंबई,महाराष्ट्र,भारत अशा भूभागांच्या पत्रिका आणि भविष्यकथन असे प्रकार दिसतात, असे पूर्वापार चालत आले आहे की हा केवळ राजकारण आणि समाजकारणामुळे होऊ घातलेला बदल आहे?
- जर कोणत्याही सजीव आणि निर्जीव यांना कुंडली,पत्रिका आणि भविष्य असते तर मग एखाद्या झाडाचे,प्राण्याचे, पक्ष्याचे इ. त्याचप्रमाणे एखादया अंतराळयानाचे, विमानाचे, बैलगाडीचे भविष्य, कुंडली, पत्रिका असे काही असू शकते का?
- वास्तुशास्त्र आणि ज्योतिषी यांचा काही संबंध आहे का? असल्यास/नसल्यास कसे?
- एकाच व्यक्तीचे हस्तसामुद्रिक,कुंडली यावरून वेगवेगळ्या 'निष्णात' 'भविष्यवेत्त्यांनी' वर्तवलेल्या 'भविष्यांमधे' साम्य असल्याची उदाहरणे आहेत का?
- ज्योतिषाचे शास्त्र म्हणून मूळ कोणत्या ग्रंथांमधे सापडते?
-नीलहंस.