वरील चर्चेत येता जाता ग्रह आणि तारे यांचा उल्लेख आहे. आणि बिचाऱ्या राहू-केतुंनाही उगाचच टपल्या मारलेल्या आहेत.
खगोल शास्त्र आणि ज्योतिष(शास्त्र) यामधील फरक लक्षात घेतल्यास ग्रह ताऱ्यांचा यात काही दोष नाही हे लक्षात येईल.

ग्रह-तारे यांच्या गतीचा अभ्यास करते ते खगोलशास्त्र.
ग्रह-तारे यांच्या गतीमुळे मानवी जीवनावर किंवा आणखी कशावर परिणाम होतो त्यामुळे (किंवा होत नसेलही तरीही) ग्रह ताऱ्यांमुळे भविष्य वर्तवता येते अश्या पूर्वग्रहावर आधारित ज्योतिष(शास्त्र). (मुळात ज्योतिष-शास्त्र हा शब्दही खगोलशास्त्रासाठी आपल्याकडे योजला गेलेला शब्द आहे. पण तो अर्थ आत जवळजवळ लुप्त झालाय).

आपल्या मान्यते नुसार
नक्षत्र - आकाशातील अश्या वस्तू ज्या परस्परांच्या तुलनेत आपले स्थान बदलत नाहीत.
ग्रह - नक्षत्रांच्या तुलनेत स्वतःचे स्थान काही निश्चित गतीने बदलणाऱ्या वस्तू.
या व्याख्यांनुसार, आणि पूर्वी उपलब्ध असलेल्या माहिती नुसार, सूर्य चंद्र हे ग्रहच होय. पाचवीतला मुलालाही सूर्य हा तारा आहे असे म्हणून आपल्या शास्त्राला दोष देण्यात काहीही अर्थ नाही.
खरी चूक आपण जेंव्हा planet लाही ग्रह म्हणू लागलो तेंव्हा झाली.  planet आणि statelite साठी दुसरा शब्द योजता आला असता.
तात्पर्य, सूर्य आणि चंद्राला ग्रह म्हणणे हा काही शास्त्राचा दोष नव्हे. त्या काळातील त्या संज्ञा आहेत, त्या काळाला अनुरूप आणि आवश्यक.

राहू केतु- राहू आणि केतुंचा अभ्यास सूर्य आणि चंद्रग्रहणासाठी आवश्यक ठरतो. राहू आणि केतु म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्या अनुक्रमे सूर्य आणि पृथ्वी भोवतीच्या भ्रमण कक्षांचे छेदनबिंदू. या दोन बिंदूपैकी एकावर चंद्र असताना अमावस्या किंवा पौर्णिमा असल्यास ग्रहण असते. त्यामुळे ज्योतिष्यांना धोपटताना उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढू नये.
ज्योतिष शास्त्रावर (खरेतर फलज्योतिषावर) टीका करताना, आपण खऱ्या विज्ञानाची कास सोडू नये.