आपण म्हणता त्यानुसार संज्ञामध्ये व त्यांच्या अर्थामध्ये गफलत होत असावी हे मत ग्राह्य मानले तर त्यात तथ्यांश किती हे पटवण्याकरता काही दाखले दिल्यास अधिक योग्य होईल असे वाटते.
पूर्वीच्या संज्ञा आहेत तश्या वापरताना पूर्वीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत/नाहीत हे कोण आणि कसे सांगणार? काळानुरूप या शास्त्रात कोणते बदला झाले आहेत अथवा नाहीत? झाले असल्यास त्याची सांगड गणित/खगोल ह्याच्याशी कशाप्रकारे घातली जाते? बदल झाले नसल्यास हे शास्त्र कालबाह्य होत आहे असे म्हणावे का?
-नीलहंस