चांद्र आणि सौर्य राशीचक्रांमध्ये बारा राशींचे साम्य कसे काय? असे असूनही सौर्यराशी तारखेवार मात्र चांद्रराशी जन्म-स्थल-काल-तिथी यानुसार... असे कसे?

राशी आहेत तश्याच आहेत. कोणता आकाशीय गोल कोणत्या राशीत आहे हे काढताना आपली पृथ्वीवरील जागेवरून त्या ग्रह/गोल याला जोडणारी सरळ रेष काढून ती अंतराळात मागे खेचली की त्या ग्रह/गोलाची राशी समजते.

शाळेत शिकलेला भूगोल आठवा...आता...

पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून एक सूर्यराशी ३६५ दिवस भागिले १२ (राशी) इतके दिवस 'चालते'. आणि तेच कारण सूर्यराशी तारखेवर असण्याचे आहे. कारण ती सरळ रेषा रोज जवळ जवळ फक्त १ अंशातून फिरते. तसेच पृथ्वी-सूर्य अंतराच्या दृष्टीने पृथ्वीचा व्यास नगण्य आहे. म्हणून तुम्ही पृथ्वीवर कोठेही असला तरी राशीत फार फरक पडत नाही. फक्त 'कस्प' किंवा संक्रातीच्या दिवशी तुम्ही पृथ्वीवर कुठे आहात ते महत्त्वाचे ठरू शकते. (वर्षभरात १२ संक्रांत असतात, आपण मकर संक्रांत साजरी करतो.) 

चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. साधारणतः दिवसात (२४ किंवा २७ तास, नक्की आठवत नाही.) एक फेरी मारतो. त्यामुळे ती सरळ रेषा एका दिवसात ३६० अंशातून फिरते. त्यामुळे स्थल-काल-तिथी महत्वाची ठरते.

हे भूगोलाच्या नियमांना धरून आहे असे वाटते. यात काही गैर नाही, हे गणित आहे, आकडेमोड करून सांगता येते असे दिसते. म्हणूनच संगणकीकरण शक्य आहे.