तथ्यांश नसायला काय झाले?
पूर्वीही सूर्य-चंद्राला गती होती आताही आहे. या सूर्य-चंद्राच्या गती पृथ्वीसापेक्ष आहेत एवढे लक्षात घेतले म्हणजे झाले.
राहू केतुही पूर्वी होते, आता ही आहेत.
नवीन शोध लागल्यामुळे त्यात काहीही बदल झालेला नाही. आज आकाशात कोणती नक्षत्र, कोणते ग्रह दिसणार, ग्रहण कधी होणार, हे पंचांग पाहूनही सांगता येतेच. आधुनिक ज्ञाना मुळे त्यात तपशीलाची भर पडली आहे इतकेच.
हे सर्व शास्त्र गणित आणि खगोलावरच आधारित असल्यामुळे, त्याची या विषयांशी सांगडही आहेच.

जेव्हा कोणी हे ग्रह गणित वापरून मर्त्य मानवाच्या आयुष्याचा हिशेब मांडू लागतो, तेव्हा गोंधळास सुरुवात होते.
-मन्दार.