हे सर्व शास्त्र गणित आणि खगोलावरच आधारित असल्यामुळे, त्याची या विषयांशी सांगडही आहेच.

जेंव्हा कोणी हे ग्रह गणित वापरून मर्त्य मानवाच्या आयुष्याचा हिशेब मांडू लागतो, तेंव्हा गोंधळास सुरुवात होते.

सहमत. तेंव्हा हे 'शास्त्र' गणिताकडून अंदाजाकडे वळते. हे अंदाज फक्त अनुभवावर आधारीत आहेत.

या अनुभवांचा कुठेही 'सेंट्रल डेटाबेस' आहे का? की ज्याच्याशी ती पत्रिका जुळवून भाकीत करता येईल? आणि तसे केले जाते का? थोडक्यात जसे पत्रिका संगणकाद्वारे मांडता येऊ शकते तसे भाकितांचे संगणकीकरण करता येईल का?

तसे असले आणि तसे केले तरीही ते भाकीतच आहे. आणि म्हणूनच त्यावर विश्वास ठेवणे आम्हाला फार जड जाते. 

'भाकीत' या शब्दाचे 'भाकड' या शब्दाशी जवळचे नाते आहे असे वाटते.