मला वाटते कै. नरसिंह रावांनी मराठी साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावरुन बोलताना या विषयाला वाचा फोडली होती. त्यांच्या भाषणातले एक उदाहरण उच्चभ्रू हे होते. High-brow या इंग्रजी संज्ञेचे हे शब्दशः भाषांतर आहे. मला वाटते, चहाच्या पेल्यातील वादळ (Storm in tea-cup) किंवा मातीचे पाय (feet of clay) हे वाक्प्रचार जे आपण मराठीतील असल्याप्रमाणेच वापरतो, ते मूळ इंग्रजीतील आहेत. पु.लं.च्या एका लेखात त्यांनी पैशाची ऊब हा वाक्प्रचारदेखील आयात केलेला असावा असे म्हटले आहे. (कारण आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय देशात गारवा अधिक सुखद असतो.) 

पण मला वाटते, असे आदान-प्रदान अपरिहार्य आहे (वाक्प्रचार सामावून घेण्याचे, शब्दशः भाषांतराचे नव्हे) आणि दोन्ही भाषांकरिता लाभदायी आहे. नदीप्रमाणेच भाषादेखील प्रवाही आणि लवचिक असली तरच काळाच्या ओघात लुप्त न होता वेगवेगळे प्रवाह सामावून घेत वाहत राहते.