शशांक यांच्या ज्या लेखाचा संदर्भ आपण दिला आहेत, त्यात काही थोड्या गफलती आहेत.

हो, त्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे,
मध्यंतरी डिस्कव्हरी वाहिनीवर आलेल्या एका कार्यक्रमात मी हे ऐकले. पण हे सर्व संशोधकांना मान्य नाही असेही त्या कार्यक्रमात नमूद केले होते.

अशा प्रकारे वैज्ञानिक संकल्पनांचा कुठे पारंपरिक मिथकांशी संबंध ज़ोडताना आपण अधिक सावध राहिले पाहिजे. आपला हे सर्व लिहिण्याचा उद्देश अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे हे मान्य आहे. परंतु त्यातूनच छद्मविज्ञानाच्या शोधात असणाऱ्यांना चुकीचे संदेश ज़ावू शकतात, याचे भान असावे.

हे १००% मान्य आहे.

आपले एकूण विश्लेषण आवडले.