छान. भूक लागली वाचून.
काही प्रश्नः
१. ही कृती पातळ भाजीची आहे का घट्ट?
२. कोणाकोणाला चालत नसल्यास सिमला मिरची आणि कांदा काढला तर चालेल का? त्याने चव खूप बिघडेल का?(अर्थात हा प्रकारही वाचून तोंडाला पाणी सुटले आहे.)
३. कोणत्या पालेभाज्यांना लसणाची फोडणी द्यावी आणि कोणत्याना देउ नये? (मी सामान्यतः मेथीला लसणाची फोडणी दिलेली पाहिली आहे. पण बाकी भाज्यांचे काय नियम आहेत?)
४. वेळ वाचवण्यासाठी कोणत्या भाज्या कुकरमधे शिजवाव्या लागतात आणि कोणत्या कुकरमधे शिजवल्यास त्यांची वाट लागते?(म्हणजे, कोणत्या भाज्याना बाहेर शिजायला वेळ लागतो म्हणून कुकरमधे शिजवतात?)
५. भाज्या कुकरमधे शिजवल्यास १ शिट्टी करावी का भातासारख्या ३?
(हे काही घरच्या वेगवेगळ्या रिती पाहून आलेले मूलभूत प्रश्न.)
-शिकाऊ अनु