१. माझी आजी आणि तिची मद्रासी भाडेकरीण हिचा १९७५ च्या सुमारास असलेला खराखुरा संवाद.
आजी > ( अर्थातच सगळे तीच बोलणार आणि बाकी श्रोतेच राहिले पाहिजे अशी जन्मसिद्ध अपेक्षा.), क्या हुआ, जाग आई, फिर सुब्बे उठी, तो देखा, कावळे कोकलणे लगे, पटपट उठी, जागी, फिर झाडु लगाया, पाणी भरने लगी. फिर देखा, अंधेरा तो खुप था. फिर घडी देखी, तो सिर्फ ३ १/२ बजे थे, ऐसी फजिती हुयी ना.
२. एकदा रेल्वेत जातांना ऐकलेला संवाद, जग्गा नही तो सरकु किधर?
३. मी नवीनच कामाला लागलो होतो ( १९८७), कधीही फोनवर बोलण्याची सवय नाही, पुरवठादार ( वेन्डर्स ) ला बोलायचो, अगोदर इंग्रजी, मग तेच परत हिंदीत बोलायचो. एकदा एकाने तेथुन विचारले, ' युअर गुड नेम प्लिज', मी उत्तरलो, ' माय गुड नेम इज कलंत्री '. बाकी सगळे वरिष्ठ ऐकत होते, सगळे गालातल्या गालात हसत होते एकमेकांकडे नेत्रपल्लवी करत होते आणि मी घामाघुम झालो होतो.