अनु,
१. ही कृती घट्ट (कोरडी) भाजीची आहे.
२. सिमला मिरची व कांदा यांच्या वेगवेगळ्या भाज्या करणे.
३. मेथीशिवाय पालकाच्या पातळ भाजीला पण लसणाची फोडणी दिली तरी चालते.
४. पालेभाजी कोरडी करायची असेल तर ती बाहेरच शिजवणे.
५. पालक, मेथी, आळू या भाज्या कूकरमधे शिजवणे. बाकी वांगे, प्लॉवर, कोबी शिजवले की पूर्ण वाट लागते.
६. श्रावणघेवडा(बीन्स), कांदेबटाटा रस्सा ह्या भाज्या छोट्या कूकरमधे तिखट-मीठ-मसाला, दाण्याचे कूट, ओला नारळ व थोडे पाणी घालून एका शिटीमधे शिजतात.
७. सर्व प्रकारच्या उसळी कूकरमधे फोडणी देवून एका शिटीमधे शिजतात. (वेळ वाचतो)
८. भरली तोंडली करायची असल्यास ती आधी कूकरमधे शिजवून घ्यावी.
९. पालेभाज्या चिरुन व धुवुन घेउन डाळ भाताबरोबरच कूकरमधे शिजवणे. ३ शिट्या चालतात.
रोहिणी