अनु, भोमेकाका, जयन्ता५२ एकदम सही चालू आहे.
पुण्यात एका उड्डाणपुलाचे काम सुरू असताना "वर्क इन प्रोग्रेस" चे शब्दशः भाषांतर केलेला "कामात प्रगती आहे" असा फलक पाहिला होता.
शिवाय "स्पीडब्रेकर अहेड" चे शब्दशः भाषांतर करून
"पुढे गतिरोधक आहे" ऐवजी आजकल "गतिरोधक पुढे आहे" लिहितात. बहुतेक "गतिरोधक पुढे आहे, इतक्यात काळजीचे कारण नाही" किंवा "इथे कितीही चढ-उतार असले तरी 'खरा' गतिरोधक अजून यायचा आहे" असा संदेश द्यायचा असेल :)
(द्रुतगती महामार्गावर, "बोगदा पुढे आहे" असे लिहिलेले असते, चालकांना डोळे आहेत आणि 'इथे' बोगदा नाही हे त्यांना दिसू शकते यावर त्यांचा विश्वास नसावा)