होय, 'कोंबडी वडे'वाल्या कोंबडीची कृती हीच. वड्याची कृती दुर्दैवाने मला माहित नाही. (खायचे माहितीए.) 
पायाचे सूपही मी कधी केले नाही. आणि जो पर्यंत मी स्वतः करून पाहत नाही, आणि तो पदार्थ माझ्या पसंतीस उतरत नाही तो पर्यंत मी त्याची पाककृती दुसऱ्यांसमोर ठेवीत नाही. वरील दोन्ही पदार्थ आधी मला शिकावे लागतील आणि नजिकच्या काळात ते शक्य दिसत नाहीए. क्षमा असावी. अर्थात, एकदा केले आणि जमले की पहिले काम म्हणजे मनोगतावर सादर करणे. पाहूया कधी मुहूर्त लागतो ते.